टेक्नोलॉजी माहिती

२४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोने काल स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं असून पहिल्याच दिवशी या चॅनलने अनेक विक्रम केले आहेत. अवघ्या ९० मिनिटात दहा लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले होते. आत्तापर्यंत सर्वाधिक वेगाने दहा लाख सबस्क्रायबर्स आणि एक कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलंडण्याचा विक्रम रोनाल्डोच्या नावे झाला आहे.

यापूर्वीचा सर्वाधिक वेगाने एक कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलंडण्याचा विक्रम Mr Beast च्या नावे होता आणि त्याला १३२ दिवस लागले होते. रोनाल्डोला ते करण्यासाठी फक्त १२ तास लागले! आता २४ तास पूर्ण व्हायच्या आत कदाचित २ कोटी म्हणजेच 20 Million सबस्क्रायबर्ससुद्धा पूर्ण होतील! (लेख प्रकाशित केल्या नंतर हा सुद्धा विक्रम झाला आहे!)

रोनाल्डोच्या यूट्यूब चॅनलची लिंक : https://www.youtube.com/@cristiano

रोनाल्डो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बराच प्रसिद्ध आहे!

  • Instagram : ६३.६ कोटी (636 Million)
  • Facebook : १७ कोटी (170 Million)
  • X (Twitter) : ११.२ कोटी (112 Million)

यूट्यूबने लगेचच गोल्डन प्ले बटनसुद्धा पाठवलं असून त्याबद्दल रोनाल्डोने व्हिडिओसुद्धा प्रकाशित केला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​