टेक्नोलॉजी माहिती

RED सिनेमा कॅमेरा कंपनी निकॉनने विकत घेतली! – MarathiTech

[ad_1]

निकॉन (Nikon) ही आघाडीची कॅमेरा निर्माती कंपनी RED डिजिटल सिनेमा ही कंपनी विकत घेत आहे. ही कंपनी Jim Jannard (Oakley चे संस्थापक) यांनी स्थापन केली होती आणि गेल्या बऱ्याच वर्षांपासून डिजिटल सिनेमा कॅमेऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांचे RED One 4K आणि V-Raptor X द्वारे अनेक चित्रपटांचं शूटिंग झालं आहे. आता RED ही कॅमेरा कंपनी निकॉनची उपकंपनी बनेल.

RED च्या अद्वितीय इमेज कॉम्प्रेशन टेक्नॉलॉजी आणि कलर सायन्ससह सिनेमा कॅमेऱ्यातील ज्ञानाचा व्यावसायिक डिजिटल सिनेमा कॅमेरा मार्केटमध्ये विस्तार करण्यासाठी वापर करण्याची निकॉनला आशा आहे. Aquaman, Red Notice, Flash, Guardians of the Galaxy Vol. 3, Captain Marvel, Planet Earth II, Squid Game, Mindhunter, Peaky Blinders आणि The Queen’s Gambit अनेक प्रमुख चित्रपट आणि टीव्ही शो चित्रित करण्यासाठी त्यांचे कॅमेरे वापरले गेले आहेत.

सध्या त्यांचे Komodo, Komodo-X, V-Raptor X, V Raptor XL X हे कॅमेरे प्रसिद्ध आहेत. V Raptor X सिरीज मधील कॅमेरा हे जगातले पहिले लार्ज फॉरमॅट ग्लोबल शटर सिनेमा कॅमेरा आहेत!

अधिक माहिती : Nikon to Acquire US Cinema Camera Manufacturer RED.com, LLC

काही वर्षांपूर्वी याच रेड कंपनीने त्यांचा Hydrogen One नावाचा स्मार्टफोनसुद्धा आणला होता मात्र त्याला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही.



[ad_2]

Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button