सरकारी योजना

National Minority Scholarship for Girls Online Apply


अल्पसंख्याक समाजातील मुलींनी राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावे

National Minority Scholarship for Girls Online Apply link is given for Minority Girls. From this year onwards, applications for the Begum Hazrat Mahal National Scholarship for girls from minority communities studying in Class IX to XII of the Central Government will have to be made online. For this, the interested girls are required to apply on the National Scholarship Portal. Accordingly, a scholarship of Rs. 5,000 each is given to the girls of class IX and X and Rs. 6,000 each for the girls of class XI and XII. The scholarship scheme will be implemented by the State Directorate of Minority and Adult Education.

Begum Hazrat Mahal National Scholarship for girls

केंद्र सरकारच्या इयत्ता नववी ते बारावीत शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठीच्या बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी यंदापासून ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी इच्छुक असलेल्या मुलींना राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळावर (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल) अर्ज करणे आवश्‍यक आहे. यानुसार इयत्ता नववी व दहावीच्या वर्गातील मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी पाच हजार रुपये तर, अकरावी व बारावीच्या वर्गातील मुलींसाठी सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेची राज्याच्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयामार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे.

यासाठी राज्याचे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक दिनकर पाटील यांची राज्य समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सरकारची मान्यता असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधून इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील (मुस्लिम ,ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी व जैन) मुली यासाठी पात्र आहेत.

अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलींचे शिक्षण आर्थिक कारणांमुळे शिक्षण अपूर्ण राहू नये, हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे. यासाठी इच्छुक असलेल्या मुली या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील असणे आणि मागील वर्षीच्या वर्गात किमान ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. याशिवाय पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावे लागते. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो, असे शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

Eligibility for National Minority Scholarship

  1. Eligible for girls from religious minority communities (Muslim, Christian, Buddhist, Sikh, Parsi and Jain) who are studying in class IX to XII from all government approved and all medium schools.

Required Documents for National Minority Scholarship

या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  2. मागील वर्षीचे गुणपत्रक
  3. आधार कार्ड
  4. बँक पासबुक प्रत
  5. अल्पसंख्याक असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र
  6. बोनाफाईड सर्टिफिकेट.

Amount of Begum Hazrat Mahal National Scholarship

Classes Amount of scholarship
Class IX & X Rs. 5000/-
Class XI & XII Rs. 6000/-

How to apply for National Minority Scholarship for Girls Online Apply

Online Apply Link


अन्य महत्वाच्या योजना !!



Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​