टेक्नोलॉजी माहिती

सॅमसंगची Galaxy S24, S24+ आणि S24 Ultra सादर! आता GalaxyAI सह!

[ad_1]

सॅमसंगने काल रात्री झालेल्या कार्यक्रमात त्यांचे नवे फ्लॅगशिप फोन्स सादर केले असून यामध्ये Galaxy S24, Galaxy S24+ आणि Galaxy S24 Ultra चा समावेश आहे. यावेळी सॅमसंगनेसुद्धा AI ची जोड देत या तिन्ही फोन्समध्ये Galaxy AI द्वारे अनेक सोयी दिल्या आहेत. या फोन्सना तब्बल ७ अँड्रॉइड ओएस अपडेट्स मिळणार असल्याचं सॅमसंगने जाहीर केलं आहे! म्हणजेच Android 21 पर्यंत अपडेट्स मिळू शकतील!

या मालिकेतील पुढील प्रमाणे काही गोष्टी तिन्ही फोन्समध्ये मिळतील : तिन्ही फोन्समध्ये OneUI 6.1 ही Android 14 आधारित ओएस असेल. IP68, LTPO AMOLED डिस्प्ले, 120Hz refresh rate, NFC, Corning Gorilla Glass Victus 3

Galaxy AI

सॅमसंगने यावेळी प्रथमच त्यांच्या फोन्समध्ये AI आधारित फीचर्सचा स्वतंत्र समावेश करत बऱ्याच सोयी दिल्या आहेत.

  • Circle to Search : तुम्ही हे फोन्स वापरत असताना कधीही स्क्रीनवर दिसणाऱ्या गोष्टी बद्दल माहिती हवी असल्यास केवळ त्यावर सर्कल केलं की लगेच तो भाग गूगलवर सर्च केला जाईल आणि त्याची पूर्ण माहिती मिळेल. उदा. एखादी वस्तू/ड्रेस असं काहीही…
  • Live Translate : लाईव्ह ट्रान्सलेट द्वारे आपण एखाद्या परभाषिक व्यक्तीसोबत फोन कॉल सुरू असताना समोरची व्यक्ती त्याच्या भाषेत बोललेला संवाद आपल्याला आपण निवडलेल्या भाषेत ऐकवेल आणि आपण बोललेला संवाद त्या व्यक्तीला त्याच्या भाषेत ऐकवेल सोबत स्क्रीनवर सुद्धा मजकूर दिसेल! उदा. आपण इकडून इंग्रजीत बोलत असू आणि समोरची व्यक्ती कोरियन भाषेत बोलत असेल तर त्यांना आपण बोललेल्या गोष्टी कोरियन भाषेत भाषांतरित करून आवाजासकट ऐकवल्या जातील! हे सर्व लाईव्ह घडेल!
  • Note Assist : आपण पेनने काढलेल्या नोट्सना टेक्स्टमधून रूपांतरित करून त्यांची Summary AI द्वारे एका क्लिकवर तयार करून मिळेल!
  • Photo Assist : गूगलच्या पिक्सल प्रमाणे आपण काढलेल्या एखाद्या फोटोमध्ये नको असलेली वस्तू/व्यक्ती काढून टाकता येते, एखाद्या व्यक्तीची फोटोमधील जागा बदलायची असेल तर तो सुद्धा पर्याय यामध्ये आहे. जागा बदलल्यावर मूळ जागी आपोआप फोटोतील प्रसंग ओळखून Fill केलं जाईल.

Galaxy S24 Ultra : या फोनमध्ये 6.8″ Dynamic AMOLED 2X 120 Hz Quad HD+ डिस्प्ले, 2600Nits Brightness, 200MP + 50MP + 12MP + 10MP असा मागचा कॅमेरा सेटप, 8K रेजोल्यूशन व्हिडिओ रेकॉर्डिंग, 5X Optical Zoom, 100x Digital Zoom, सेल्फीसाठी 12MP कॅमेरा, Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 12GB रॅम, 256GB/512GB/1TB UFS 4.0 स्टोरेज, USB 3.2 Gen 1, Bluetooth v5.3, NFC, 5000mAh बॅटरी

Galaxy S24 Ultra
256GB – ₹1,29,999
512GB – ₹1,39,999
1TB – ₹1,59,999

Galaxy S24+ : या फोनमध्ये 6.7″ Dynamic AMOLED 2X 120 Hz Quad HD+ डिस्प्ले, 50MP + 10MP + 12MP असा मागचा कॅमेरा सेटप, 8K रेजोल्यूशन व्हिडिओ रेकॉर्डिंग, 3X Optical Zoom, 30x Digital Zoom, सेल्फीसाठी 12MP कॅमेरा, Exynos 2400 प्रोसेसर, 12GB रॅम, 256GB/512GB स्टोरेज, USB 3.2 Gen 1, Bluetooth v5.3, NFC, 5000mAh बॅटरी

Galaxy S24+
256GB – ₹99,999
512GB – ₹1,09,999

Galaxy S24 : या फोनमध्ये 6.2″ Dynamic AMOLED 2X 120 Hz FHD+ डिस्प्ले, 50MP + 10MP + 12MP असा मागचा कॅमेरा सेटप, 8K रेजोल्यूशन व्हिडिओ रेकॉर्डिंग, 3X Optical Zoom, 30x Digital Zoom, सेल्फीसाठी 12MP कॅमेरा, Exynos 2400 प्रोसेसर, 8GB रॅम, 256GB/512GB स्टोरेज, USB 3.2 Gen 1, Bluetooth v5.3, NFC, 5000mAh बॅटरी

Galaxy S24
256GB – ₹79,999
512GB – ₹89,999

Galaxy Ring

याच कार्यक्रमात सॅमसंगने Galaxy Ring चीही घोषणा केली मात्र याबद्दल अधिक माहिती नंतर सांगितली जाईल. ही एक हेल्थ ट्रॅकिंग स्मार्ट अंगठी आहे.

Galaxy AI मधील काही सोयी खालील फोन्सवरसुद्धा उपलब्ध होणार आहेत.

  • Galaxy S23 series (including FE)
  • Galaxy Z Fold5 & Flip5
  • Galaxy Tab S9 series

[ad_2]

Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button