ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन – MarathiTech

आयफोन १६ मालिकेत ॲपलने काल एक नवा फोन जोडला असून नव्या फोनचं नाव iPhone 16e असं आहे. त्यांच्या नेहमीच्या iPhone 16, 16 Plus आणि 16 Pro, 16 Pro Max मध्ये हा नवा सदस्य दिसेल. A18 प्रोसेसर, ॲपल इंटेलिजंस, चांगली बॅटरी लाईफ आणि त्यांच्या म्हणण्यानुसार 2-in-1 48MP चा एक कॅमेरा असा सेटप आहे.
याची भारतीय किंमत आहे. ₹59900 होय स्वस्त फोन म्हणून लॉंच करत असताना ॲपलने जाहीर केलेली ही किंमत आहे. हा फोन भारतात २८ फेब्रुवारी पासून खरेदी करता येईल.

याचा डिस्प्ले 6.1″ Super Retina XDR display OLED 60Hz, A18 chip with 4‑core GPU, 2-in-1 camera system 48MP Fusion, 26 तासांची बॅटरी लाईफ, USB‑C (USB 2) पोर्ट, Action button, FaceID मिळेल. रंगामध्ये ब्लॅक आणि व्हाईट हे दोनच पर्याय आहेत.
किंमत
₹59900 128GB
₹69900 256GB
₹89900 512GB
Source link