वर्ल्ड कप २०२४ चे वेळापत्रक जाहीर; इंडियाचा पहिला सामना या तारखेला
ICC Mens World Cup Schedule : वर्ल्ड कप २०२४ चे वेळापत्रक जाहीर; पहा भारतीय संघाला कोणत्या गटात स्थान
ICC Cricket World Cup : दक्षिण आफ्रिकेत पुढल्या वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
पाच वेळच्या विजेत्या भारताचा पहिला सामना २०२०च्या विजेत्या बांगलादेशविरुद्ध ब्लोएमफोंटेन येथे होणार आहे, तर यजमान दक्षिण आफ्रिका सलामीच्या लढतीत वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. १६ संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील ४१ सामने ५ वेगवेगळ्या मैदानांवर खेळवण्यात येणार आहे ICC Mens World Cup Schedule.
भारतीय संघाला अ गटात बांगलादेश, आयर्लंड व अमेरिका यांचा सामना करायचा आहे. ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व स्कॉटलंड; क गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे व नामिबाया, तर ड गटात अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड व नेपाळ यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल ३ संघ सुपर सिक्स मध्ये खेळतील, त्यानंतर उपांत्य फेरी व फायनल होईल ICC Mens World Cup Schedule.
भारताचे सामने :-
- २० जानेवारी – वि. बांगलादेश
- २५ जानेवारी – वि. आयर्लंड
- २८ जानेवारी – वि. अमेरिका
Source link