तुमच्या नावावर किती SIM Card रजिस्टर आहेत चेक करा ? | Check all SIM Cards registered on your Aadhar
नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण तुमच्या नावावर किती सिम आहेत ते चेक कसे करायचे या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आजकाल सायबर क्राइम खूप वाढलेले दिसून येतात. या मध्ये फ्रॉड कॉल्सचे प्रमाण जास्त असलेले दिसून येते. खरंतर हे फ्रॉड लोकं ज्या नंबर वरून कॉल्स करतात ते नंबर त्यांचे स्वतः चे नसतात, तर ते इतर व्यक्तीच्या नावाने सिम कार्ड घेऊन त्याचा गैरवापर करतात. आणि बऱ्याचदा लोकांना माहीत ही नसतं की त्यांच्या नावावर कोणीतरी सिम कार्ड घेऊन त्याचा गैरवापर करत आहे. म्हणून जर असे सिम तुमच्या नावावर असतील तर भविष्यात तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या नावावर किती सिम कार्ड्स आहेत ते जाणून घेतले पाहिजे. तुम्हाला ही जर तुमच्या नावावर किती सिम चालू आहेत हे घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने जाणून घ्यायचे असेल तर आमचा आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
भारत सरकारने नागरिकांसाठी नवीन Sancharsaathi नावाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहेत जे सर्व राज्यांसाठी लागू असेल. याच पोर्टल मार्फत तुम्ही तुमच्या आधार कार्ड वर किती सिम कार्ड चालू आहेत. ते चेक करू शकता. तसेच जर तुमच्या नावावर वर दुसरे कोणते सिम चालू असेल तर अश्या सिम कार्डचा तुम्ही रिपोर्ट करून ते बंद करू शकता.
तुमच्या नावावर किती SIM Card आहेत चेक करा
तर मित्रांनो, आता आपण TAFCOP पोर्टल मार्फत तुमच्या नावावर किती सिम चालू आहेत ते कसे चेक करायचे त्या बद्दल माहिती जाणून घेऊ या. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला sancharsaathi.gov.in या वेबसाईट च्या पोर्टल वर जायचे आहे.
स्टेप 2: त्या नंतर पोर्टल च्या होम पेज वर थोडे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला know Your Mobile Connection TAFCOP या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 3: आता tafcop च्या वेबसाईटवर आल्या नंतर तुम्हाला Login करायचे आहे. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकून खाली दिलेला कॅपचा टाकायचा आहे. व त्या नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो टाकायचा आहे. व नंतर Log In ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4: आता नेक्स्ट पेज वर तुमच्या नावावर कोण कोणते सिम कार्ड चालू आहेत त्यांची लिस्ट बघायला मिळेल. या लिस्ट मध्ये जे मोबाईल नंबर दिलेले आहेत ते पहिले चार व शेवटचे चार या पद्धतीने दर्शविलेले असतात. यातील सर्व नंबर्स तुम्ही वापरत असाल तर काही करायची गरज नाही.
मित्रांनो, समजा दिलेल्या लिस्ट मधील एखादा नंबर तुमचा नसेल आणि तुम्हाला त्याला रिपोर्ट करायचे असेल तर सर्वात आधी तर त्या नंबरला सिलेक्ट करायचे आहे. त्या नंतर त्या नंबरच्या खाली तीन ऑप्शन दिलेले आहेत.
- Not My Number (म्हणजे हा माझा नंबर नाही. जर तुम्हाला हा नंबर माहीत नसेल तर रिपोर्ट करण्यासाठी तुम्ही हा ऑप्शन निवडायचा आहे)
- Not Required (जर तुम्ही या आधी कधी हा नंबर वापरला असेल आणि जर आत्ता वर्तमान मध्ये तुम्ही हा नंबर वापरत नसाल आणि जर तुम्हला तुमच्या आधार वरून हा नंबर हटवायचा असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.)
- Required
तर मित्रांनो, असे नंबर जे तुम्ही कधी वापरले नाही, तुम्हाला ते माहीत ही नाहीत, त्यांना बंद करताना आधी वरील तीन पैकी एक कारण म्हणजेच ऑप्शन सिलेक्ट करायचा व नंतर Report या बटन वर क्लिक करायचे आहे.
Report बटन वर क्लिक केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट (रिपोर्ट) स्वीकारली जाते. तसा तुम्हाला वरती मेसेज येइल. या मधेच तुम्हाला रिपोर्ट नंबर किंवा Complaint Number किंवा Referense Number पण जनरेट होऊन दाखवला जातो. हा नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे.
आता या नंतर तुम्हला काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही ओळखत नसलेला किंवा नको असलेला नंबरचा रिपोर्ट TRAI ला केला आहे. आता तुमचा रिपोर्ट हा ज्या कंपनी चे सिम आहे त्या कंपनीला फॉरवर्ड केला जाईल व तो नंबर बंद केला जाईल.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण तुमच्या नावावर किती सिम चालू आहेत ते ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे या बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।
Source link