ड्रायव्हिंग लायसन्स माहिती | Driving Licence Information In Marathi
Driving Licence Information In Marathi मित्रांनो आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे जर आपण 2 व्हिलर आणि 4 व्हिलर किंवा कोणत्याही प्रकारचे वाहन चालवत असाल तर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे आणि जर आपण विना लायसन्स गाडी चालवत आहे तर आपण शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत आहोत, यासाठी आपल्याला दंड भरावा लागू शकतो म्हणून आजच्या पोस्टमधे आपण ड्रायव्हिंग लायसन्स माहिती | Driving Licence Information In Marathi याबद्दल जाणून घेणार आहोत…
ड्रायव्हिंग लायसन्स माहिती | Driving Licence Information In Marathi
ड्रायव्हिंग लायसन्स काय आहे? What is Driving License In Marathi
ड्रायव्हिंग लायसन्स हे भारत सरकारने जारी केलेले अधिकृत दस्तऐवज आहे, ज्याचा उपयोग करून आपल्याला मोटारसायकल, 4 व्हीलर, ट्रक, बस इ. सारख्या वाहनांना चालविण्यास परवानगी दिली जाते. आपल्या भारतात हे ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याला प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) द्वारा जारी केले जाते.
मोटार वाहन कायदा 1998 च्या अंतर्गत विना ड्रायव्हिंग लायसन्स कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
ड्रायव्हिंग लायसन्सचे प्रकार – Types Of Driving Licence In Marathi
ड्रायव्हिंग लायसन्सचे बरेच प्रकार आहेत. यातील काही महत्त्वच्या प्रकारांविषयी पाहूया.
2 व्हिलर लायसन्स
⚫ MC 50 CC – Motor cycle 50 CC
⚫ MC EX 50 CC – Motorcycle more than 50 CC
⚫ MCWOG – Motor Cycle Without Gear
⚫ MCWG – Motor Cycle With Gear
3 व्हिलर लायसन्स
⚫ LMV 3W NT – Light Motor Vehicle three Wheeler Non Transport
⚫ LMV 3W TR – Light Motor Vehicle three Wheeler Transport
4 व्हिलर लायसन्स
⚫ LMV – Light Motor Vehicle
⚫ LMV NT – Light Motor Vehicle Non Transport
⚫ LMV TR – Light Motor Vehicle Transport
हेव्ही लायसन्स
⚫ HPMV – Heavy Passenger Motor Vehicle
⚫ HGMV – Heavy Goods Motor Vehicle
⚫ HTV – Heavy Transport Vehicle
⚫ LDRXCY – Loader, Excavator, Hydraulic Equipment)—For Commercial purpose of all hydraulic heavy equipment.
ड्रायव्हिंग लायसन्स साठी लागणारी कागदपत्रे – driving license documents in marathi
जेव्हा आपण ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतो तेव्हा आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे फार महत्वाचे आहे –
आपली जन्मतारीख असलेलं खालीलपैकी कोणतंही एक प्रमाणपत्र
१. जन्माचा दाखला
२. निवडणूक ओळखपत्र
३. शाळेची टीसी
४. पॅन कार्ड
५. पासपोर्ट
आपला पत्ता असलेलं खालीलपैकी कोणतंही एक प्रमाणपत्र
१. पासपोर्ट
२. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी
३. रेशन कार्ड
४. लाईट किंवा फोन बिल
५. आधार कार्ड
जर आपण दुसर्या शहरात राहत असाल तर सध्याचा पत्ता पुरावा म्हणून आपण गॅस बिल, वीज बिल किंवा भाडे कराराच्या स्वरूपात अलीकडील युटिलिटी बिलाची प्रत सादर करू शकतो.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ची पात्रता
आपल्याला आपले ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर आपल्याला खालील पात्रता निकष पूर्ण करावे लागतील…
🔷 उमेदवार हा भारताचा कायमस्वरुपी नागरिक असणे आवश्यक आहे..
🔷 उमेदवार हा 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
🔷 16 वर्षाचे उमेदवार विना गियर असलेल्या वाहनांसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
🔷 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असलेले उमेदवार गियर असलेल्या वाहनांसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
🔷 वैद्यकीय प्रमाणपत्र
🔷 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींसाठी, वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
🔷 उमेदवाराला ट्राफिक नियमांची माहिती असावी.
🔷 उमेदवार हा मानसिकदृष्ट्या निरोगी असला पाहिजे.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याअगोदर सर्वप्रथम आपल्याला लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढणे आवश्यक आहे.
जर आपण वाहन चालविण्याचा प्रयत्न करत असाल तर आपल्याकडे लर्निंग लायसन्सचा अर्ज असणे आवश्यक आहे.
मित्रांनो आता आपण घरी बसून सुद्धा लर्निंग लायसन्स काढू शकतो. कोरोनामुळे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पहिले आपल्याला लर्निंग लायसन्स काढण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी RTO ऑफिस मध्ये जावे लागत होते आणि तेथे गेल्यावर आपल्याला टेस्ट द्यावी लागत होती. पण आता सर्व ऑनलाईन झाले आहे. आपण घरी बसून लर्निंग लायसन्स काढू शकतो आणि ऑनलाईन टेस्ट पण देऊ शकतो.
लर्निंग लायसन्स काढण्यासाठी फक्त आपल्याकडे आधार कार्ड हवे आहे.
Note: लक्षात ठेवा: आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असेल तरच आपण ऑनलाईन घरी बसून लर्निंग लायसन्स काढू शकतो. आणि जर आपल्या आधार कार्डला
मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपल्याला RTO ऑफिसला जावून लर्निंग लायसन्स काढावे लागेल.
लर्निंग लायसन्स काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
Parivahan.gov.in या वेबसाइटवर येऊन आपण लर्निंग लायसन्स काढू शकतो.
लर्निंग लायसन्स काढल्यावर, या लर्निंग लायसन्सची वैधता सहा महिन्यांसाठी वैध असेल. या सहा महिन्यांच्या आत आपल्याला वाहन चालवायला शिकावे लागेल. आपण लर्निंग लायसन्स काढल्यावर एका महिन्यांनंतर पर्मनंट लायसन्ससाठी अर्ज करू शकतो. लर्निंग लायसन्सची सहा महिन्यांची वैधता संपण्यापूर्वी आपल्याला पर्मनंट लायसन्ससाठी अर्ज करावा लागतो.
Parivahan.gov.in या वेबसाइटवर येऊन आपण पर्मनंट लायसन्स काढू शकतो.
ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यास काय करावे?
आपले ड्रायव्हिंग लायसन्स हरवले आहे काळजी करू नका? या स्टेप ला फॉलो करा…
सर्वप्रथम आपल्याला आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जावे लागेल. तेथे जाऊन आपल्याला आपल्या हरवलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सबद्दल तक्रार करावी लागेल. तक्रार नोंदविल्यानंतर त्या तक्रारीची एक प्रत आपल्या जवळ सुरक्षित ठेवा.
त्यानंतर आपल्याला नोटरी कार्यालयात जावे लागेल आणि एक प्रतिज्ञापत्र तयार करावे लागेल ज्यामध्ये असे लिहिले जाईल की आपला ड्रायव्हिंग लायसन्स हरवला आहे. हे प्रतिज्ञापत्र आपण शपथ घेतल्याचे प्रमाणपत्र म्हणून कार्य करेल.
आपले दुसरे ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी हे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. हे प्रतिज्ञापत्र आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स फॉर्मसह जोडावे लागेल.
अशा प्रकारे आपले दुसरे ड्रायव्हिंग लायसन्स तयार होईल.
मला आशा आहे की, मित्रांनो तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स माहिती | Driving Licence Information In Marathi हा मराठी लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसेच तुम्हाला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता आणि तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻
Source link