टेक्नोलॉजी माहिती

आता गूगल पे Google Pay SoundPodउपलब्ध : UPI पेमेंट अलर्ट्ससाठी नवा पर्याय!

Google Pay SoundPod

गूगल पे ने भारतात त्यांचा स्वतःचा Google Pay SoundPod उपलब्ध करून दिला असून याद्वारे दुकानदार/व्यावसायिक UPI पेमेंट्स स्वीकारल्यानंतर त्याबद्दल ऑडिओ नोटिफिकेशन ऐकू शकतात. जवळपास वर्षभर काही ठराविक ठिकाणी याची चाचणी केल्यानंतर गूगल इंडियाने त्यांचं हे उत्पादन आता सर्वांसाठी उपलब्ध केलं आहे.

Google Pay SoundPod बद्दल अधिकृत माहिती : https://support.google.com/pay-offline-merchants/answer/14011657?hl=mr

सध्या बाजारात Paytm Soundbox, PhonePe SmartSpeaker, mSwipe Soundbox, BharatPe Speaker असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. अलीकडेचे Paytm वर RBI ने केलेल्या कारवाईमुळे त्यांच्या ग्राहकांना बऱ्याच अडचणी येत आहेत. त्यामुळे नेमकी हीच वेळ साधत गूगलने त्यांचा SoundPod आणला आहे.

या SoundPod मध्ये एक छोटा LCD डिस्प्ले, एक स्पीकर, 4G Network आहे. यामधील नोटिफिकेशन भाषेसाठी मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ, गुजराती, कन्नड आणि इंग्लिशचा पर्याय आहे.

याचे प्लॅन्स खालील प्रमाणे असतील.

  • दैनिक प्लॅन: ₹४९९ रुपये एक वेळचे शुल्क, त्यानंतर तुमच्या सेटलमेंट खात्यामधून महिन्यातील २५ दिवसांसाठी दररोज ₹५ रुपये वजा केले जातात.
  • वार्षिक प्लॅन: तुमच्या सेटलमेंट खात्यामधून एका वर्षासाठी ₹१४९९ रुपये (₹५०० वाचवा) वजा केले जातात.
  • टीप: तुम्ही ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवांसाठी निवडलेले वरीलपैकी कोणत्याही प्रकारचे सदस्यत्व हे अ‍ॅक्टिव्हेशनच्या तारखेपासून सुरू होते आणि दरवर्षी दिले जाते. वर नमूद केलेल्या सेवा प्लॅनमध्ये करांचा समावेश आहे.
  • टीप: तुम्हाला GPay QR कोडद्वारे एका महिन्यात ४०० पेमेंट मिळतात, तेव्हा ₹१२५ रुपयांच्या कॅशबॅकची हमी दिली जाते.

अधिक माहितीसाठी वर दिलेल्या लिंकवर जाऊ शकता किंवा 18003097597 या फोन क्रमांकावर संपर्क साधा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​